Friday, 2 February 2018

मराठी उखाणे...

रुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन
   __  रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन

 नव्या आयुष्याची नवी नवी गाणी
   __ च्या घराण्यात  __ रावांची झाले मी राणी

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते
   __ रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते

सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
  __ रावाचं नाव ह्ळुच ओठी येई

हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी
    __ रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी

शिंपल्यात सापडले माणिक मोती
    __ रावांच्या जीवनात झाले मी सारथी

महादेवाला बेल,विष्णूला तूळ्स
    __ रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस

आंनदाने भरला दिन हा लग्नाचा
    __ रावांना घास देते गोड जिलेबीचा

मनाच्या व्रुंदावनात आंनद डोलते भावनेची तुळस
    __ रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळ्स

आई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी
    __ रावांच्या संसारात करीन मी सूखाची व्रुष्टी

सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी
    __ रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी

सुवर्णाची अंगठी, रुप्याचे पैजंण
    __रावांचे नाव घेते ऐका सारेजण

सासरचे निराजंन माहेरची फुलवात
    __ रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
    __रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

माहेर जणू गंगा, सासर जणू सागर
    त्यातच एकरुप  __ रावांचे सूख निर्झर
आकाशाच्या अंगणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश
    __रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश
पायातल्या जोडव्यात माहेरची स्म्रुती
    __ रावांच्या स्नेहाने गेली माझी भिती
सत्य प्रुथ्वीचा आधार, सूर्य स्वर्गाचा आधार
   यज्ञ देवतांचा आधार  __राव माझे आधार

मंगळ्सूत्रात राहे सासरची प्रीती
 __रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती

पित्याचे कर्तव्य संपले, कर्तव्याला माझ्या सुरूवात
__ रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनात

गजाननाची क्रुपा, गुरुंचा आशीर्वाद
__रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात

सुर्यबिंबाचा कुंकुम तिलक, प्रुथ्वीच्या भाळी
__ रावांचे नाव घेते  __ च्यावेळी

संसाराच्या देव्हा-यात उजळ्तो नंदादीप समाधानाचा
__रावांचे नाव घेऊन, मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा

स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी
__रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्यावेळी

रुप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा
__रावांचे नाव घेते मिळो आशिर्वाद तूमचा

नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा
__रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छा

मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार
__रावांच्या रुपाने झाला साक्षात्कार

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी
__रावांच्या जीवनात आहे मला गोडी

सर्वाना नमस्कारासाठी जोडते हो हात
__रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट

भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची
__रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची

जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले
__ रावांच्या नावाकरीता एवढे का अडविले

शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान
__ रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मान

आत्मरुपी करंडा, देहरुपी झाकण
_रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण

कुलीन घराण्यात जन्मले, कुलवान घराण्यात पडले
__रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले

माहेरच्या ओढीने डोळे येतात भरुन
__रावांच्या संसारात मन घेते वळून

लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी
__रावांचे नाव घेते तुमच्यासाठी

संसाररुपी कादंबरीचे उघडले पहिले पान
__रावांचे नाव घेऊन तुमचा करीते मान

लक्ष्मी शोभते दागदागिन्यांनी, विद्या शोभते विनयाने
__ रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाने

संसाररुपी सागरात प्रेमरुपी सरोवर
आयुष्याचा प्रवास करते   __रावांबरोबर

नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा
__रावांचे नाव असते ओठांवर, पण प्रश्न असतो उखाण्याचा

सुखी संसारात हवी विश्वासाची जोड
__रावांचे नाव घेते, घास घालून तोंड करते गोड

अरुणासह ऊषा आली, सोनियाची प्रभा पसरली
__रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरली

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
आजपासून मी झाले  __रावांची ग्रुहमंत्री

शब्द तिथे नाद कवी तिथे कविता
__रावांची जोड जणू सागर आणि सरिता

 नव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पर्दापण
__रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण

चंदनाच्या झाडावर बसला मोर
__रावांच्या जीवावर मी आहे थोर

चंद्राचा उदय, समुद्राला भरती
__रावांच्या शब्दांनी सारे श्रम हरती

सूख समाधान तिथे लक्ष्मीचा वास
__रावांना देते मी जिलेबीचा घास

पदस्पर्शाने लंवडते उंबरठ्यावरलं माप
__रावांची भाग्यलक्ष्मी म्हणुन ग्रुहप्रवेश करते आज

घराला असावं अंगण, अंगणात डोलावी तूळस
__रावांच्या जीवनात चढवीन आंनदाचा कळस

सूख दू:खाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले
__रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले

अंलकारात अंलकार मंगळसूत्र मूख्य
__रावांचा आनंद हेच माझे सौख्य

मंगळ्सूत्र हा सौभाग्याचा अंलकार
__रावांच्यासह ध्येय, आशा होवोत साकार

आकाशाच्या पोटी चंद्र, सूर्य, तारांगणे
__रावांचे नाव घेते तूमच्या म्हणण्याप्रमाणे

नीलवर्ण आकाशात चमकतात तारे
__रावांचे नाव घेते लक्ष दया सारे

सांयकाळ्चे वेळी नमस्कार करते देवाला
__रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला

इग्रंजी भाषेत चंद्राला म्हणतात मून
__रावांचे नाव घेते  __ची सून

खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड
__रावांचे नाव अम्रुतापेक्षा गोड

इग्रंजी भाषेत आईला म्हणतात मदर
__ रावांचे नाव घेते सोडा माझा पदर

फुलात फुल जाईचे फुल
__रावांनी घातली मला भूल

साता जन्मीची पूण्याई फळाला आली आज
__रावांच्या हाताने ल्याले मंगळ्सुत्राचा साज

पत्रिका जुळ्ल्य़ा योग आला जूळून
__राव पती मिळावे म्हणून नवस केला कुलदेवतेला स्मरुन

 संसार सागरात प्रीतीच्या लाटा
__रावांच्या सुखदु:खात उचलीन मी अर्धा वाटा

आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस
__राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस

सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह
__रावांचे नाव घेण्यास नको मला आग्रह

लाल चूटूक मेंदी, हिरवागार चुडा
__रावांसाठी जीव झाला माझा वेडा

आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर
आयुष्याचा प्रवास करीन  __रावांच्या बरोबर

आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा
__राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा

सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी
__राव झाले माझ्या सौभाग्याचे धनी

मनोभावे प्रार्थना करुन पुजला गौरीहर
__रावांचा सहवास लाभो जन्मभर

प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी
जीवनाचे पूष्प वाहिले  __ रावांच्या चरणी

चांदीच्या ताटात पक्वानांची रास
__रावांना देते लाडूचा घास

रंगबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते
लाडूचा गोड घास  __ रावांना देते

मंगळागौरीची पूजा मनोभावे करते
__रावांसाठी दीर्घायुष्य मागते

चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल
__रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊल

नातेवाईक जमले केले मोलाचे आहेर
__रावांच्या सहवासासाठी सोडले मायेचे माहेर

उंबरठयावरचं माप पायांनी लोटते
__रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते

आई, बाबा येते आशीर्वाद दयावा
__रावांचा सहवास जन्मभर लाभावा

आईबाबांच्या आशिर्वादाची शाल घेते पांघरुन
__रावांच्या बरोबर मन गेले गांगरुन


मोत्याची माळ, सोन्याचा साज
__रावांचे नाव घेते मंगळागौर आहे आज

मंगळागौरी माते नमन करते तुला
__रावांचे अखंड सौभाग्य लाभू दे मला

दिवाळीच्या सणाला दिव्यांच्या पंक्ती
__रावांना ओवाळते मंगल आरती

थोर कुळांत जन्मले, सुसंस्कारात वाढले
__रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले

सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा
__रावांच्या सहवासात आनंदाला नाही तोटा

मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा
__रावांच्या संसारात लावीन दिप नवा

संसाराच्या वेलीवर फुलले नवे फुल
__रावांना लागली बाळाची चाहूल

फुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे
__रावांच्या बाळाचे आज आहे बारसे

गुलाबांचा ताटवा, लतांचा कुंज
__रावांच्या बाळाची आज आहे मौंज

गोकुळात आला क्रुष्ण, सर्वांना झाला हर्ष
__रावांच्या बाळाला लागले पहिले वर्ष

सोन्याची घुंगरं, चांदीच्या वाळ्या
सोनार घडवी दागिने   __रावांच्या बाळाला

वरातीच्या मिरवणूकीत सनईचे करुण सूर
__रावांच्या बरोबर जातांना मनात होते हूरहूर

दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र
__रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र

अंबाबाईच्या देवळासमोर ह्ळ्दीकुंकवाचा सडा
__रावांच्या नावावर भरते लग्नचुडा

आला श्रावणमास, पाऊस पडला शेतात
__रावांचे नाव घेते धनधान्यसंपन्न घरात

शरदाचे चांदणे, मधुवनी फुले निशी़गंध
__रावांचे नाव घेण्यात मला आहे आनंद

जीवनात ही घडी अशीच राहू दे
__रावांचे प्रीतफुल असेच हसु दे

संथ वाहती गंगा, यमुना, आणि सरस्वती
__रावांचे नाव हीच माझ्या प्रेमाची महती

कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात
__रावांचे नाव घेते माझ्या मनात
श्रीरामाच्या पाऊली वाहते फुल आणि पान
__रावांचे नाव घेते, राखते सर्वांचा मान

निळया आकाशी रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे
लग्नाच्या दिवशी  __ वाटे   __रावांचे नाव घ्यावे

नागपंचमीच्या सणी सख्या पुजती वारुळाला
__रावांविना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला

"नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा ,
__रावांचे नाव असते ओठावर पण प्रश्न असतो उखाण्यांचा !!"

"नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद ,
__चे नाव घेते द्या सत्यनारायणाचा प्रसाद !"

"अमूल्य आहेत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद न सदिच्छा ,
असेच सदैव मी व __च्या पाठीशी राहा हि मनीषा !"

"कळी हसली ,फुल उमलले,मोहरून आला सुगंध,
__च्या सोबतीत मला गवसला जीवनाचा आनंद !"

"आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद ,
__चे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद!"

"एका वर्षात महिने असतात बारा,
__या नावात सामावलाय आनंद सारा!"

"दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
__चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी!"

 "आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
__चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा!"

लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडू
रावांना घास देताना,मला येई गोड हसू .

शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी
राव म्हाजे माझ्या जीवनसाथी .

चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल,
__रावांच्या जीवनात टाकते मंगलमई पाऊल.

आकाशाच्या अंगणात ,ब्रह्मा ,विष्णू आणि महेश,
__रावांचे नाव घेऊन करते हो गृहप्रवेश .

गर्द आमराई त्यामाध्ये पोपटाचे थवे,
__चे नाव माझ्या ओठी यावे .

५+४=एक़ुअल तु नाइन,
__इज माइन.

गोव्यावरून आणले काजू ,
__रावांच्या थोबाडीत द्यायला मी का लाजू .

वड्यात वडा बटाटावडा,
__मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा .

सुंदर सुंदर हरिणाचे इवले इवले पाय ,
आमचे हे अजून कसे नाही आले .
गटारात पडले कि काय .

डाळीत डाळ तुरीची डाळ ,
हिच्या मांडीवर खेल्विन एका वर्षात बाळ .

निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान ,
__रावांचा आवडता छन्द म्हणजे सतत मदिरापान .

एक होती चिऊ एक होती काऊ ,
__रावांचे नाम घेते काय काय खाऊ .

शिडीवर शिडी बत्तीस शिडी ,
__राव ओढतात विडी अन मी लावते काडी .

तेलाच्या दिव्याला तुपाची वात ,
__रावांशी केले लग्न ,आता आयुष्याची वाट .

विडाच्या पानात पावशेर कात ,
__रावांच्या कमरेत घातली गाढवाने लात .

चांदीच्या ताटात ठेवले होते गहू ,
लग्न झालेच नाही तर नाव कशे घेऊ .

साठ्यांची बिस्किटे ,बेदेकारंचा मसाला,
__नाव घ्यायला आग्रह कशाला .

हाताने कराव काम मुखाने म्हणावे राम ,
रावांचे चरण हेच माझे चारधाम .

आला आला रुकवत त्यावर चहाची किटली ,
नवरा नवरी सिनेमा बघायला बसली तर मध्येच फिलिंम तुटली .

सागवानी पेटीला सोन्याची चूक ,
__रावांच्या हातात कायद्याचे बुक .

चांदीचा पात सोन्याचे ठसे ,
__राव बसले आंघोळीला सोन्यावाणी दिसे.

केले देते सोलून पेरू देते चोरून ,
__रावांच्या जीवावर कुंकू लावते कोरून .

नदी पलीकडे नदी
मधी पेरला लसून,
पतीदेव जाऊ नका रुसून
आपण दोघे जाऊ रिक्षात बसून .

आनंदाने भरला ,दिन हा लग्नाचा ,
__ल घास देते ,गोड जिलेबीचा .
मंगळसूत्रात राहे सासरची प्रीती,
__चे नाव घेऊन समाधान चित्ती .

स्वाती नक्षत्रातील थेम्बाने
शिंपल्यात होते मोती ,
__चं संगतीत
उजळते जीवनज्योती .

चांदीच्या ताटात हळदी कुंकवाचा काला ,
__रावांच नाव घ्यायला आजच प्रारंभ केला .

मांडवाच्या दारी पुजला वारू,
कारभारी रोज घ्या दारू
पण मला नका मारू .

चांदीच्या ग्लासात गुलाबी सरबत ,
मालक निघाले पन्धरर्पुरला
मला नाही करमत .

जन्माची गाठ बांधली सर्वा समोर,
__नाव घेते  ,परत मारू नका बर .

चांदीच्या ताटात फणसाचे गरे ,
__राव दिसतात बरे पिच्चारला
नेतील तेवाच खरे .

गिरजा शंकर सीता राम यांना गुरु करू ,
__राव आपण दोघे संसारसागर तारू .

रुपयाची डबी त्यात आताराचा बोळा
__रावांचे बोलणे शंभर रुपये तोळा.

उभी होते मळ्यात ,
नझर गेली ख्ळ्यात,
हजाराची कंठी
__रावांच्या गळ्यात .

मंगलदेवी मंगलमाते वंदन करते तुला,
__रावांचे आयुष्य वाढो हीच प्रथना तुला.

कुरुंदाची सहन चंदनाचे खोड
__रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड .

महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू ,
__रावांचे नाव घेऊन हिंदमातेचा जयघोष करू .

चांदीची फटफटी सोन्याची सीट ,
नवरा म्हणे बायकोला जाऊ आपण डबलसीट .

रामाने राज्य दिले भारत ने नाकारले
__रावांच्या जीवावर सौभाग्य स्वीकारले .

तळ्यातल्या चिखलात लाल कमल उमलले,
__राव खड्यात पडले ,त्यांना दुसर्याने काढले .

वाकडी तिकडी बाबुळ,तिच्यावर बसलेला होला
सखा पाटील मेला म्हणून तुका पाटील केला .

कॉम्पुटर ल असते फ्लोपी डिस्क ,
हिच्याशी लग्न करून घेतली मोठी रिस्क .
संसाराच्या मधातली सारपिट  __च्या साथीने पसरला ,
तृप्ततेचा सुगंध मी सुखाने अनुभवला .

सुख समृद्धी ,समाधान आणि संस्काराची शालीनता,
__च्या मिठीमध्ये तृप्त होइ तृप्तता .

बकुळीचा बकुलगंध , मृतात्कींचा मृदगंध ,
__ची जीवनसाथ हा रेशमी ऋणानुबंध .

माझं सार आयुश्य जणू __च्या दुअल सीमचा हंड्सेट,
मान्ग्लाष्टकाची रीन्ग्टोन अन अंतर्पाठ दूर होताच जो झाला अकटीवेट.

मागासुत्रातल्या दोन वाट्या सासर आणि माहेर,
__रावांनी दिला सौभाग्याचा आहेर .

दान दागीण्यापेक्षा शब्द हवा गोड ,
__रावांच्या संसाराला __ची जोड .

सासरची सर्वा मानस आहेत हौशी ,
__रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी.

कर्दळीच्या वनात चान्डोल्पक्षी लपला
__शी लग्न करून __जन्मला.

रेशमी सदर्याला प्लास्टीकचे बटन ,
__यांना आहे टक्कल ,पण डोक्यात नाही अक्कल .

पहिली सोनी,दुसरी मनी,तिसरी जनी ,
सोडल्या तिघीजणी नी झालो ठकीचा धनी.

अलीकडे अमेरिका पलीकडे अमेरिका ,
नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारिका.

कालच पिच्चर पहिला नाव त्याचे सायको ,
__रावांच नाम घेते  __रावांची बायक

गणपतीच्या देवळात शंकरची आरती ,
__गेले वरती नी मी राहले खाली

संपात संप कामगारांचा संप ,
__रावांच्या हातात ढेकणाचा पंप

कुत्र्यात कुत्रा अल्शेसियान कुत्रा,
__रावांनी बांधले गळ्यात बांधले मंगलसूत्र

No comments:

Post a Comment